Posts

साक्षात्कार मानवतेचा (2020)

Image
मानवता हाच खरा धर्म Published: 2015-01-14 13:23:38 IST n देवाने जीवसृष्टी तयार केली .त्यात मानव प्राणी सुद्धा बनवला. माणसाला बुद्धी दिली,भावना व्यक्त करण्यासाठी  भाषा दिली .मात्र हे इतर प्राण्यांना दिल नाही .पुढे माणूस समूहाने एकत्र राहू लागला .आणि त्या त्या प्रदेशानुसार  माणसाचे  नियम  वेगवेगळे झाले  आणि मग उदा. मुस्लीम ,ख्रिश्चन  असे धर्म सोयीसाठी  बनले.  सगळे धर्म चांगलेच आहेत , कोणताच धर्म दुसऱ्या धर्माविषयी चुकीचा विचार सांगत नाही पण तरीही नेहमी दोन धर्मांमध्ये भांडण होतात .या पार्श्वभूमीवर असा एखादा धर्म नाही का निर्माण होऊ शकत ,जेथे माणसे भांडण करणार नाही ,लढाया करणार नाही ,युध्द करणार नाही असा  धर्म  माझ्यामते मानव धर्म.सर्व धर्मातल्या  संतांनी मानवता धर्माचाच पुरस्कार केला आहे .आता मानवता धर्म म्हणजे  काय? तर माणुसकीचे  वर्तन म्हणजे  मानवता धर्म , जे जे मला हवे ते ते दुसऱ्याला देण म्हणजे माणुसकी. गाडगे बाबांनी भुकेलेल्यांना अन्न दिल , तहानलेल्यांना पाणी पाजल,रोग्यांची सेवा केली ,धर्मशाळा बांधल्या . सावित्रीबाई फुले , महात्मा फुलेंनी  शाळा काढली  हे खरे मानव